घरमहाराष्ट्रनाशिकदेवी यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

देवी यात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल

Subscribe

शहरातील कालिका देवी आणि भगुर येथील रेणुका देवी यात्रेच्या पार्श्वभुमीवर हा बदल करण्यात आला आहे.

नाशिक : नवरात्रोत्सवाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. पोलीस प्रशासन नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाले आहे. शहरातील कालिका देवी व भगुर येथील रेणुका देवी यात्रोत्सव काळात शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

कालिका देवी

कालिका देवी मंदिर येथे नवरात्रोत्सव यात्रा भरते. २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी मोडक चौक सिग्नल ते संदीप हॉटेल कॉर्नर, संदीप हॉटेल कॉर्नर ते मोडक सिग्नल, मनापा आयुक्त निवासस्थान ते भूजल सर्व्हेक्षण कार्यालय, भूजल सर्व्हेक्षण कार्यालय ते मनपा आयुक्त निवासस्थान, चांडक सर्कल ते संदीप हॉटेल, महामार्ग बसस्थानक ते संदीप हॉटेल या मार्गावरुन जाणार्‍या व येणार्‍या सर्व वाहनांना वाहतुकीसाठी सकाळी ५ ते १२ आणि सायंकाळी ६ ते १२ वाजेपर्यंत बंदी करण्यात आली आहे.

- Advertisement -

असा आहे  शहरातील पर्यायी मार्ग

मोडक सिग्नल, खडकाळी सिग्नलमार्गे ६० फुटी रोड, व्दारका सर्कल मार्गे नाशिकरोड, सिडकोकडे जावे. * मुंबईनाक्याहून बसस्थानक टॅक्सी स्टॅण्ड, तुपसाखरे लॉन्स, हुंडाई शोरुम समोरुन चांडक सर्कल, भवानी सर्कल मार्गे त्र्यंबक रोडने जावे. * व्दारका सर्कल, गरवारे टी पॉईंटमार्गे सातपूर एमआयडीसीमध्ये जावे. * व्दारका सर्कल, कन्नमवार पूल, संतोष टी पॉईंट, रासबिहारी स्कूलमार्गे पंचवटीकडे जावे. सारडा सर्कल, गडकरी चौकाकडे येणारी वाहने एन.डी.पटेल रोड, किटकॅट चौफुली मार्गे मोडक सिग्नल मार्गे जावे.

रेणुका माता

भगूर विभागातील रेणुकादेवी मंदिर, रेस्ट कॅम्प रोड येथे नवरात्र उत्सवानिमित्त यात्रा भरते. २९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर या कालावधीत वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी रेस्ट कॅम्परोड चिंतामणी चौफुली ते नाका क्रमांक २ भगूरपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी सकाळी ५ ते ११ व सायंकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

- Advertisement -

असा असेल पर्यायी मार्ग

भगर गावाकडून देवळाली कॅम्पकडे जाणार्‍या वाहनांनी चिंतामणी चौफुलीवरुन आर्मीगेट चौफुली, खंडेराव टेकडी रोड, पावर हाऊस टी पॉईंट, शिगवेगाव मार्गे बार्न स्कूल, लहवित रेल्वे वाय पॉईटकडे वळून नाका क्र.२ येथून पुढे जावे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -