घरमहाराष्ट्रसहनही होत नाही आणि सांगताही येत नाही - संजय राऊत

सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही – संजय राऊत

Subscribe

'महाराष्ट्रात मतांचे दुभाजन होऊ नये म्हणून शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांना युतीची गरज आहे', असे संजय राऊत म्हणाले आहेत.

शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत अजूनही साशंकता अनेकांच्या मनात आहे. शिवसेनेकडून युती होणार असे स्पष्टीकरण आले असले तरी दोन्ही पक्षांकडून औचारिकपणे घोषणा झालेली नाही. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना मते फुटू नये म्हणून युतीची गरज असल्याचे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. ‘नवभारत टाइम्स’ या हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी भाजप-शिवसेना युती संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती दिली. ‘सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी युतीची अवस्था आहे. त्यात इतक्या वर्षांपासून आमचे नातेसंबंध आहेत. त्यामुळे ही मैत्री तुटू नये, अशी आमची इच्छा आहे’, असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – ‘दिल्लीपुढे म्हणजे नेमके कुणापुढे झुकणार नाहीत शरद पवार?’

- Advertisement -

मोदींचा पाठिंबा गरजेचा – संजय राऊत

‘नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहेत. एकेकाळी बाळासाहेब ठाकरे सर्वात मोठे नेते होते. त्यांच्या नावाचा भाजपला मोठा फायदा झाला. त्यांचे नाव वापरुनच भाजप पक्ष महाराष्ट्रात वाढला. आज बाळासाहेब ठाकरे हयात नाहीत आणि मोदी सर्वात मोठे नेते बनले आहेत. जर आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींच्या पाठिंब्याची गरज भाजते मग भारतातही त्यांचा पाठिंबा हवाच आहे’, असे संजय राऊत म्हणाले.


हेही वाचा – ‘दिवाण बिल्डरला ४० टक्के फंड दिल्यामुळे पीएमसीवर निर्बंध’

- Advertisement -

‘आदित्य ठाकरे यांना १५ वर्षांचा राजकीय अनुभव’

आदित्य ठाकरे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री व्हावे, अशी शिवसेनेची इच्छा आहे. यासंदर्भात आदित्य ठाकरे यांच्या राजकीय अनुभवा संदर्भात राऊत यांना प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले, ‘कोण म्हणाले आदित्य ठाकरे यांना कमी अनुभव आहे? देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांना काय अनुभव होता? राजकारणात आपोआप अनुभव येत जातात. याशिवाय आदित्य ठाकरे गेल्या १५ वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांच्या जन आशीर्वाद यात्रेला महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद मिळाला’. त्याचबरोबर भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे का? असा प्रश्न विचारला असता ‘यासंदर्भात अद्याप चर्चा झालेली नसून निवडणुकीनंतर यावर चर्चा होईल’, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -