घरमुंबईविकासकामांमुळे हितेंद्र ठाकूरांचे पारडे जड!

विकासकामांमुळे हितेंद्र ठाकूरांचे पारडे जड!

Subscribe

हितेंद्र ठाकूर यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना शुक्रवारी मतदारसंघातील ग्रामीण भागात जोरदार प्रचार केला. यावेळी जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी पंचक्रोशीतील तरुणांशी त्यांनी संवाद साधला. रस्ते, समाजमंदिर आणि अन्य विकासकामे मार्गी लावल्यामुळे जनतेने ठाकूर यांचे स्वागत केले.

वसई मतदारसंघातील दोन शहरे व ग्रामीण भागात आमदार निधी व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून ठाकूर यांनी गेल्या ३० वर्षात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावली. क्रीडांगण, तरणतलाव, क्रीडा संकुल,मार्केट शेड, पथदिवे, सुशोभित तलाव, परिक्रमा यांचा त्यात समावेश आहे. सरकारी अडथळे पार करत ही सारी कामे त्यांनी मार्गी लावली आपण खोटी आश्वासने देऊन फसवणूक करण्याचा गोरखधंदा उभ्या आयुष्यात केला नाही व भविष्यात करणारही नाही. जे करण्यासारखे होते ते केले आणि भविष्यातही अशीच विकासकामे करणार,असा ठाम विश्वास पुन्हा एकदा त्यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisement -

या मतदार संघावर एका नजर टाकली असता विरोधकांची अवस्था अवघड होऊन बसली आहे. कारण मतदारांना सांगायचे तरी काय, लोकांच्या समस्या काय आहेत, विकासकामांसाठी फंड कुठून येतो, विकासकामांना तांत्रिक मंजुरी कुठून मिळते याबाबत अनभिज्ञ असल्यामुळे त्यांची प्रचारात त्रेधातिरपट उडत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -