भारत पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकात खेळणार का? वाचा BCCIचं उत्तर

भारतानं क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या असून बीसीसआयने यासंदर्भात चेंडू केंद्र सरकारकडे टोलवला आहे.

Mumbai
pakistan vs india flags
भारत विरूद्ध पाकिस्तान

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानची कोंडी करावी आणि लष्करी कारवाई करून हल्ल्याचा वचपा काढावा अशा भावना भारतभरातून व्यक्त होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने पाकिस्तानचा मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून व्यापारविषयक तर सिंधू जल करारातून माघार घेत पाणीपुरवठा विषयक कोंडी करायला सुरुवात केली आहे. मात्र, आता येत्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेमध्ये भारतानं पाकिस्तानविरोधातला सामना खेळावा की नाही? यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. काहींच्या मते भारतानं या सामन्यावर बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करावा, तर काहींच्या मते भारतानं या सामन्यात खेळून पाकिस्तानला हरवावं. मात्र, या पार्श्वभूमीवर बीसीसीआयनं हा निर्णय केंद्र सरकारवर सोपवला आहे. ‘केंद्र सरकार जो निर्णय घेईल, तो आम्हाला मान्य असेल’, अशी भूमिका बीसीसीआयनं घेतली आहे.

BCCI तक्रारीसाठी ICCकडे जाणार

बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी घेतलेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ‘पाकिस्तानबरोबरच्या सामन्यासंदर्भात केंद्र सरकारसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल. दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणाऱ्या देशाशी भारतानं संबंध ठेवायचे की नाही? यासंदर्भात आयसीसीकडे भूमिका स्पष्ट करणार आहे’, असं देखील विनोद राय यांनी सांगितलं.


वाचा काय म्हणतोय शोएब अख्तर – सामना रद्द करण्याचा अधिकार भारताला

सामना खेळण्याविषयी संमिश्र प्रतिक्रिया

१६ जून २०१९रोजी दुपारी ३ वाजता विश्वचषकादरम्यान भारताचा पाकिस्तानसोबत सामना असणार आहे. मात्र, पुलवामा हल्ला झाल्यानंतर हा सामना भारताने खेळू नये अशी मागणी होऊ लागली आहे. हरभजन सिंग, सौरव गांगुली आणि मोहम्मद अझरुद्दीन या माजी खेळाडूंनी ‘सामना खेळू नये’, अशी मागणी केली आहे. मात्र त्याचवेळी सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकर या दोघांनी ‘सामना खेळून पाकिस्तानचा पराभव करावा’ अशी मागणी केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here