घरदेश-विदेशव्हॉट्स अॅपवर अश्लील मेसेज आल्यास येथे नोंदवा 'तक्रार'

व्हॉट्स अॅपवर अश्लील मेसेज आल्यास येथे नोंदवा ‘तक्रार’

Subscribe

अनेकदा व्हॉट्सअॅपवरुन अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज येतात. यामुळे महिला तसेच पुरुष देखील हैराण होतात. मात्र आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण असे मेसेज आल्यास तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे.

जगभरातील लोकांच्या सर्वाधिक पसंतीस पडणारे सोशल मीडिया अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप. या व्हॉट्सअॅपचे जेवढे फायदे आहे तेवढे तोटे देखील आहेत. अनेकदा व्हॉट्सअॅपवरुन अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज येतात. यामुळे महिला तसेच पुरुष देखील हैराण होतात. मात्र अशावेळी तक्रार कुठे करावी हा प्रश्न उपस्थित होतो. मात्र आता या तणावामुळे स्वत: ला कोणताही त्रास करुन घेण्याची काहीच आवश्यकता नाही. कारण यापुढे विनाकारण त्रास देणाऱ्यांना चांगलाच दणका बसणार आहे. अश्वील आणि आक्षेपार्ह मेसेज करणाऱ्यांविरोधात आता तुम्हाला दूरसंचार विभागाकडे थेट तक्रार नोंदवता येणार आहे.

अशी नोंदवा तक्रार

एखाद्या व्यक्तीला अश्लील आणि आक्षेपार्ह मेसेज आल्यास दूरसंचार विभागाकडे तक्रार नोंदवता येणार आहे. तक्रार नोंदवल्यानंतर पुढील कारवाईसाठी तुमचा अर्ज दूरसंचार प्रदाते आणि पोलिसांकडे पाठवला जाईल. एका अधिकाऱ्यांने दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपवर येणाऱ्या आक्षेपार्ह मेसेजविरोधात आता लोक न घाबरता दूरसंचार विभागाकडे आपल्या तक्रारी नोंदवू शकतात. यासाठी पीडित व्यक्तीने संबंधित मोबाईल क्रमांकासहीत आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन [email protected] वर मेल करावा.

- Advertisement -

‘एखाद्या व्यक्तीला व्हॉट्सअॅपवर अश्लील, आक्षेपार्ह, जीवघेणी धमकी देणारे मेसेज येत असतील, तर मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकासहीत आलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट घेऊन [email protected]. वर मेल करावा. तसेच दूरसंचार सेवेत प्रदाते आणि पोलीस अधिकाऱ्यांना समोर ठेऊन आम्ही आवश्यक त्या कारवाई करु. कित्येक पत्रकारांसहित दिग्गजांनाही अश्लील आणि जीवघेण्या धमकीचे मेसेज येतात, अशा तक्रारी आम्हाला मिळाल्या आहेत. यानंतरच हे पाऊल उचलण्यात आले आहे.’ – आशीष जोशी, दूरसंचार विभागाचे संचार नियंत्रक

- Advertisement -

आक्षेपार्ह, अनधिकृत, अश्लील, जीवघेण्या धमक्या किंवा अन्य प्रकारचे चुकीचे मेसेज पाठवणाऱ्यावर बंदी असल्याचे डीओटींन १९ फेब्रुवारीला जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे. शिवाय, चुकीचे मेसेज पसरवणाऱ्या ग्राहकांवर तात्काळ कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.


हेही वाचा – ही आहे व्हॉट्सअॅप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी

हेही वाचा – ‘फिंगरप्रिंट लॉक’मुळे व्हॉट्सअॅप चॅट राहणार सुरक्षित


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -