राहुलबाबांनी लग्न न केल्यामुळे प्रियंका राजकारणात – अमित शाह

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पुन्हा एकदा गांधी परिवारावर टीकास्त्र सोडले आहे. गुजरात येथील गोध्रा येथील सभेमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं.

New Delhi
Rahul Gandhi and his sister Priyanka Gandhi during an event organised by Rajiv Gandhi Foundation at Jawahar Bhavan. *** Local Caption *** Rahul Gandhi and his sister Priyanka Gandhi during an event organised by Rajiv Gandhi Foundation at Jawahar Bhavan. Express photo by Renuka Puri.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि प्रियांका

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाह हे सध्या निवडणुकीच्या दौऱ्यावर आहेत. आज गुजरात येथील गोध्रा सभेला त्यांनी संबोधित केले. आपल्या सभेदरम्यान त्यांनी भाजप पक्षाने केलेल्या कामाची माहिती लोकांना दिली. याच बरोबर त्यांनी राहुल गांधीवर टिकास्त्र केले आहे. “काँग्रेसध्ये पंतप्रधानपदाची जागा ही जन्मापासूनच आरक्षित आहे. राहुल बाबांनी लग्न न केल्यामुळे प्रियंका गांधी राजकाणात सक्रिय झाल्या.”,असे वक्तव्य शाह यांनी केले. काँग्रेसमधला कोणी सामान्य कार्यकर्ता पंतप्रधान बनायचा विचार करु शकतो का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

काय म्हणाले अमित शाह

“भाजपमध्ये एक चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. परंतु काँग्रेसमध्ये तसं कधीही होणार नाही. शाह पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, मी भाजपाचा एक बूथ कार्यकर्ता होतो आता पदाचा अध्यक्ष झालो आहे. काँग्रेसचा एखादा कार्यकर्ता पंतप्रधान बनण्याचा विचार करु शकतो का? काँग्रेस पक्षात पंतप्रधानाची जागा ही आरक्षित असते. भाजपमधल्या कोणत्याही कार्यकर्त्याला मोठ्या पदावर पोहचवण्यासाठी एखाद्या विशेष कुटुंबात जन्म घेण्याची गरज नाही.” – भाजप अध्यक्ष, अमित शाह