Jammu: दहशतवाद्यांकडून सामान्य नागरिकाची हत्या!

अहमदचे जबरदस्तीने अपहरण करुन त्याची निघृण हत्या केली गेली.

Mumbai
Naxalite killed man in awantipora

पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपुरा येथे दहशतवाद्यांनी एका सामान्या नागरिकाचे अपहरण करुन त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री एका व्यक्तीची दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. मनजूर अहमद असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या स्थानिक पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहशतवाद्यांनी ३६ वर्षीय अहमदला जबरदस्तीने त्याच्या घरातून बाहेर घेऊन गेले. त्यानंतर काही अंतरावर जाताच दहशतवाद्यांनी अहमदची गोळ्या घालून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


वाचा: राँग साईडने आलेला टेम्पो ठरला ‘काळ’!

गुरुवारी रात्री उशीरा दहशतवादी अहमद राहत असलेल्या ठिकाणी पोहचले. त्यानंतर त्यांनी अहमदचे जबरदस्तीने अपहरण करुन त्याला घराबाहेर नेले. त्यानंतर काही वेळाने उच्च माध्यमिक शाळेजवळ अहमद याचा मृतदेह आढळून आला. मात्र, अहमद याचा मृत्यू जागीच झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनेनंतर परिसर पूर्णपणे सील करण्यात आला असून, आसपासच्या रहिवाशांमध्ये यामुळे दहशतीचे वातावरण पसरले आहे.


वाचा: सीमेवर भारतीय लढाऊ विमानांचा जोरदार सराव!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here