घरमहाराष्ट्रनाशिकआचारसंहितेचा बाऊ; अधिकार्‍यांची कानउघडणी

आचारसंहितेचा बाऊ; अधिकार्‍यांची कानउघडणी

Subscribe

लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचा बाऊ करीत ठेकेदारांची चालू कामांचीही देयके अडवणार्‍या लेखा विभागासह सार्वजनिक अभियांत्रिकी आणि पाणीपुरवठा विभागाच्या विभागप्रमुखांची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी १४ एप्रिलला कानउपटणी केली.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेचा बाऊ करीत ठेकेदारांची चालू कामांचीही देयके अडवणार्‍या लेखा विभागासह सार्वजनिक अभियांत्रिकी आणि पाणीपुरवठा विभागाच्या विभागप्रमुखांची आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी १४ एप्रिलला कानउपटणी केली. या प्रकरणात दोन्ही विभागांमधील असमन्वयाने देयके अडवली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. देयके अडवण्याचे कारण स्पष्ट होण्यासाठी प्रशासनाने लेखा विभागाचे उपायुक्त डॉ.सुहास शिंदे आणि पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संदीप नलावडे यांना नोटीसही बजावली आहे. या प्रश्न ‘आपलं महानगर’ने गुरुवारी १४ मार्चला वृत्त प्रसिद्ध केले होते.

लोकसभा निवडणुकीचा आचारसंहिता लागु झाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने आदर्श आचारसंहितेबाबत मार्गदर्शक तत्वे सर्व विभागांना जारी केले आहे. त्यानुसार तत्काळ निविदा प्रक्रियेतील कामे, कार्यारंभ आदेश दिलेली कामे, सुरू असलेल्या कामांची यादी मागवली होती. आचारसंहितेच्या काळात कार्यारंभ आदेश दिलेले कामेही न सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले होते. कार्यारंभ आदेश देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कामे सुरू असतील तरच ती कामे सुरू ठेवण्याच्या सुचना आल्याने प्रशासनाने कार्यारंभ दिलेले आदेश थांबवले आहेत. आचारसंहिता संपल्यानंतरच ही कामे होणार आहेत. दुसरीकडे या आचारसंहितेचा बाऊ करत ऐन मार्चमध्येच ठेकेदारांचे देयके अडवली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. पाणीपुरवठा विभागात काम करणार्‍या सात ठेकेदारांनी आयुक्तांकडे देयके अडवण्याबाबत तक्रार केली होती. त्यात, टप्प्यानुसार मिळणारी बिले (रनिंग बिले) अडवण्यात आले होते. त्यामुळे नगरसेवकांसह पालिकेतील महत्वपूर्ण सुरू असलेली कामेही रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती. आयुक्त, लेखा विभागाचे उपायुक्त यांच्यातील वादातून हा प्रकार केला जात असल्याचा आरोपही केला जात होता. त्यामुळे गुरुवारी आयुक्त गमे यांनी या देयकांशी संबधित असलेले सार्वजनिक अभियांत्रिकी आणि पाणी पुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, उपायुक्त सुहास शिंदे यांना पाचारण करत, याबाबत जाब विचारला. त्यावर शिंदे यांनी टप्पा काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्रे नसल्याने देयके कसे देणार, असा सवाल केला. पाणीपुरवठा विभागाने आरोप फेटाळून लावले. त्यामुळे ही सगळे देयके तपाण्याचे आदेश देत प्रमाणपत्र असेल तर टप्पा कामाचे देयके अदा करा, अशा सूचना आयुक्तांनी सर्व विभागांना दिल्यात. त्यामुळे हा सावळा गोंधळ तपासण्यासाठी प्रशासनाने दोन्ही विभागप्रमुखांना नोटीसा देऊन याबाबतचा नेमका खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

- Advertisement -

ठेकेदारांच्याही अडचणीत वाढ

काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र सादर न करताच देयके काढण्याचा प्रयत्न केला जाण्याची शंका आता प्रशासनानला आली येत आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार आहे. त्यामुळे ठेकेदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -