घरदेश-विदेशतिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, शांततेत प्रश्न सोडवू

तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, शांततेत प्रश्न सोडवू

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थीची ऑफर दिली होती. यावर भारताने प्रतिक्रिया दिली असून तिसऱ्या पक्षाच्या मध्यस्थीची गरज नाही, शांततेत प्रश्न सोडवण्यासाठी चीनशी संपर्क साधत आहोत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादावर मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या या ऑफरवर भारताने आता प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. हा प्रश्न शांततेत सोडवण्यासाठी आम्ही चीनशी संपर्क साधत आहोत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी ट्विट केलं की भारत आणि चीन यांच्यात सीमा वादाच्या मुद्यावर अमेरिका मध्यस्थी करण्यास तयार आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की आम्ही भारत आणि चीन या दोन्ही देशांना माहिती दिली आहे की त्यांना गरज असल्यास अमेरिका सीमा वादात मध्यस्थी करण्यास तयार आहे. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही गेल्या वर्षी भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी करण्याची ऑफर दिली होती. तरीही काश्मीर हा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मुद्दा आहे. कोणत्याही तिसऱ्या पक्षाने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही,असं भारताने म्हटलं होतं.

- Advertisement -

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनीही नेपाळ आणि चीनमधील सद्यस्थितीवर भाष्य केलं. पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, भारत आणि नेपाळमध्ये घनिष्ट संबंध आहेत. कोरोना साथीच्या वेळीसुद्धा आम्ही परवान्याशिवाय व्यापार सुनिश्चित केला आहे. आम्ही सीमाप्रश्नावर नेपाळमधील परिस्थितीवर लक्ष ठेवत आहोत. ते म्हणाले की परस्पर समन्वय आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन भारत नेहमीच सर्व शेजार्‍यांशी चांगलाच वागला आहे.


हेही वाचा – कमी चाचण्या करुन गुजरात आकडा नियंत्रित ठेवतोय?

- Advertisement -

चीनकडून झालेल्या LAC गतिरोधकाबद्दल ते म्हणाले की, सैनिकांनी सीमा व्यवस्थापनाबाबत अत्यंत जबाबदार दृष्टीकोन धरला आहे. आमच्या सैन्याने दोन्ही बाजूंनी स्थापित केलेल्या प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन केलं आहे. अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, आपल्या सशस्त्र सैन्याने आपल्या नेतृत्वाने दिलेल्या मार्गदर्शनाचे प्रामाणिकपणे पालन करत आहेत. त्याच वेळी, आम्ही आमच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करू.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -