Happy Birthday Big B: दमदार आवाजात अमिताभ बच्चन यांनी गायलेली सुपरहिट गाणी

Happy Birthday Big B amitabh bachchan superhits song sung by him
Happy Birthday Big B: दमदार आवाजात अमिताभ बच्चन यांनी गायलेली सुपरहिट गाणी

भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अशी ओळख असलेल्या बिग गी यांच्या आज ७८वा वाढदिवस आहे. ११ ऑक्टोबर १९४१ मध्ये उत्तर प्रदेशच्या अलाबादमध्ये अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला. अमिताभ बच्चन यांचे मूळ नाव अमिताभ हरिवंश राय बच्चन आहे. अमिताभ बच्चन यांनी कोलकत्यातील एका जहाजवाहतूक कंपनीतील एजेंटची नोकरी सोडून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. ७ नोव्हेंबर १९६९मध्ये त्यांचा पहिला चित्रपट ‘सात हिंदुस्तानी’ प्रदर्शित झाला होता. १९६९ साली सुरू झालेला त्यांचा प्रवास आजही यशस्वीरित्या सुरू आहे. त्यांनी फक्त आपल्या अभिनयाने नाही तर आवाजाने देखील प्रेक्षकांची मने जिंकली. अमिताभ बच्चन यांनी अनेक चित्रपटात गाणी गायली आहेत. आजही त्यांची ही गाणी चाहत्यांच्या मनावर भूरळ घालतात. त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी गायलेली ही १२ गाणी…

१. नीला आसमान – सिलसिला

२. रंग बरसे – सिलसिला

३. मेरे अंगने में – लावारिस

४. मेरे पास आओ – श्री नटवरलाल

५. मै यहां तू वहां – बागबान

६. होली खेले रघुवीरा – बागबान

७. पिडली सी बातें – शामिताभ

८. एकला छोलो रे – कहानी

९. चलो जाने दोन – भूतनाथ

१०. मेरे बड्डी – भुतनाथ

११. रोजाना – निशब्द

१२. अतरंगी यारी – वजीर


हेही वाचा – Amitabh Bachchan Birthday Special: पहिल्या चित्रपटासाठी बिग बींना मिळाले होते इतके मानधन