घरमनोरंजनVideo: खिलाडीकुमार अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा ट्रेलर आऊट

Video: खिलाडीकुमार अक्षयच्या ‘मिशन मंगल’चा ट्रेलर आऊट

Subscribe

भारताच्या मंगळ अभियानावर आधारित चित्रपट ‘मिशन मंगल’चा ट्रेलर आज प्रदर्शित करण्यात आले. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ म्हणजेच अक्षय कुमारने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवर हा धडाकेबाज ट्रेलर शेअर केला आहे. ‘मिशन मंगल’ हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाला प्रदर्शित होणार आहे. भारताच्या मंगळ ग्रहावर पोहोचण्याची कहाणी या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. याधी टीझरच्या सुरुवातीलाच हा चित्रपट एका वास्तविक घटनेवर आधारित असल्याचे सांगितले होते.

- Advertisement -

‘मिशन मंगल’या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार, अभेनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, अभिनेता शरमन जोशी अशी तगडी स्टारकास्ट महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केले असून या चित्रपटाची निर्मिती केप ऑफ गुड फिल्म्स तसेच होप प्रोडकशन्स तसेच फॉक्स स्टार स्टुडिओ या संस्थांनी केली आहे.

- Advertisement -

१५ ऑगस्टला या दिवशी खिलाडी कुमारला बॉक्स ऑफिसवर जोरदार टक्कर देण्यासाठी प्रभासचा ‘साहो’, जॉन अब्राहम ‘बाटला हाउस’ आणि वेबसीरीज ‘सेक्रेड गेम्स २’ हे चित्रपट रिलीज होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -