घरफिचर्स'फोटोग्राफी' करिअरच्या वाटा...

‘फोटोग्राफी’ करिअरच्या वाटा…

Subscribe

व्यावसायिक फोटोग्राफी म्हणजे फक्त 'वेडिंग फोटोग्राफी', असा अनेकांचा समज असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला व्यावसायिक फोटोग्राफीतील अन्य काही पर्यायांची ओळख करुन देणार आहोत.

आज जागतिक कॅमेरा दिन आहे. कॅमेरा म्हटलं की फोटो आणि फोटोग्राफी या गोष्टी ओघाने आल्याच. अनेकांना फोटोग्राफी क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते. मात्र, फोटोग्राफीमध्ये करिअर करायचं म्हणजे काय याची नेमकी कल्पना नसते. सहसा व्यावसायिक फोटोग्राफी म्हटलं की आपल्यासमोर फक्त ‘वेडिंग फोटोग्राफी‘ येते. मात्र, त्या पलीकडेही व्यावसायिक फोटोग्राफीच्या अनेक शाखा असतात. जाणून घेऊयात, व्यावसायिक फोटोग्राफीमधील अशाच काही निवडक प्रकारांविषयी…

फुड फोटोग्राफी : स्वत:च घरी बनवलेल्या किंवा हॉटेलमध्ये आवडलेल्या पदार्थांचे फोटो काढून, ते सोशल मीडियावर शेअर करण्याची अनेकांना आवड असते. मात्र, तुमची ही आवड तुमचा व्यवसायही बनू शकते. अनेक हॉटेल्सना त्यांनी बनवलेल्या पदार्थांची जाहिरात करण्यासाठी प्रोफेशनल फोटोग्राफर्सची गरज असते. तुम्ही त्यांच्यासाठी काम करु शकता. याशिवाय खाद्यक्षेत्रात वेबसाईट्स किंवा ब्लॉग्ज चालवणाऱ्यांसाठीही तुम्ही फूड फोटोग्राफर म्हणून काम करु शकता.

- Advertisement -
प्रातिनिधिक फोटो

निसर्ग फोटोग्राफी : यामध्ये ‘वाईल्ड लाईफ’ फोटोग्राफीचा प्रामुख्याने समावेश होतो. यामध्ये तुम्ही निसर्गाचे विविध घटक उदा. जंगली पशुपक्षी, नैसर्गिक सौंदर्य लाभलेली ठिकाणं, नद्या, डोंगर अशा असंख्य गोष्टी तुमच्या कॅमेरात कैद करु शकता. पर्यावरण संस्था किंवा विविध वाहिन्यांसाठी तसंच ट्रॅव्हल कंपन्यांसाठी तुम्ही अशाप्रकारे फोटोग्राफी करु शकता.

प्रातिनिधिक फोटो

फॉरेन्सिक फोटोग्राफी :  फॉरेन्सिक फोटोग्राफीचा सहसा संबंध येतो तो गुन्हेगारी क्षेत्राशी. एखादा अपघात किंवा घातपात झाल्यास त्याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला फोटोग्राफी करावी लागते. यासाठी तुमच्यामध्ये धैर्य असणं गरजेचं असतं. अशाप्रकारचे फोटो गुन्ह्याचा तपास करतेवेळी कोर्ट केसमध्ये पुरावा म्हणून वापरले जातात.

- Advertisement -
प्रातिनिधिक फोटो

प्रेस फोटोग्राफी : या प्रकारच्या फोटोग्राफीमध्ये तुम्हाला फोटो जर्नलिस्ट म्हणून काम करायचे असते. एखाद्या वृत्तपत्रासाठी, न्यूज चॅनेलसाठी किंवा वेबसाईटसाठी तुम्ही लोकेशनवर जाऊन फोटोग्राफी करणं अपेक्षित असतं. यासाठी तुमच्याकडे संबंधित विषयाचं प्राथमिक ज्ञान, बातमीची समज आणि जिज्ञासू वृत्ती असणं आवश्यक असतं.

प्रातिनिधिक फोटो

स्टुडिओ फोटोग्राफी : हा फोटोग्राफीतील अत्यंत बेसिक पण आजही सर्वाधिक मागणी असलेला प्रकार आहे. पॅनकार्ड किंवा कॉलेज अॅडमिशन फॉर्मसाठी लागणारे फोटो तसंच तत्सम काही डॉक्युमेंट्ससाठी लागणारे फोटो, आपल्याला स्टुडिओमध्ये जाऊनच काढावे लागतात. याशिवाय मॉडेलिंग किंवा ऑडिशनसाठी खास पोटफोलिओ बनवायचा असल्यास स्टुडिओची गरज असते.

प्रातिनिधिक फोटो (सौजन्य-shutterstock)

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -