राशीभविष्य : मंगळवार, ३ नोव्हेंबर २०२०

राशीभविष्य

मेष : चुका सुधारून राजकीय-सामाजिक क्षेत्रात वेगाने पुढे जाता येईल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. मैत्री होईल.

वृषभ : प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न यशस्वी होईल. नम्रता ठेवा. समोरच्या व्यक्तीचा विचार पूर्ण ऐकून घ्या. विचार करा.

मिथुन : खाण्या-पिण्याची चंगळ होईल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. नवीन ओळखी होतील. धंद्यात फायदा होईल.

कर्क : रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात घाई केल्यास अधिक वेळ खर्च होऊ शकतो. मैत्रीचा उपयोग होईल.

सिंह : संसारात शुभ घटना घडेल. वाद मिटवता येईल. तुमच्या कार्याला दिशा मिळेल. स्पर्धा जिंकाल.

कन्या : तात्विक वाद होईल. कुणालाही कमी लेखू नका. प्रवासात सावध रहा. क्षुल्लक वाद वाढू शकतो.

तूळ : अपेक्षित यश मिळवता येईल. नवीन ओळख होईल. नोकरीचा प्रयत्न करा. धंद्यात जम बसेल.

वृश्चिक : तुमच्या उत्साहावर कुणीतरी टीका करण्याची शक्यता आहे. ओळख वाढेल. कामाची वेळ नीट ठरवा.

धनु : तुमच्या मनाप्रमाणे घटना घडेल. उत्साह वाढेल. स्पर्धेत जिंकाल. धंद्याला कलाटणी मिळेल.

मकर : धंद्यात फायदा होईल. विचारांना चालना मिळेल. ओळखीचा उपयोग करून घ्या. केस जिंकता येईल.

कुंभ : तुम्ही ठरविलेले काम वेळेत पूर्ण कराल. नोकरीचा प्रयत्न यशस्वी होईल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील.

मीन : अरेरावी करू नका. मोहाला बळी पडाल. प्रतिष्ठा सांभाळा. वाहन जपून चालवा. राग कमी करा.