घरCORONA UPDATECISF च्या ५ जवानांना कोरोनाची लागण

CISF च्या ५ जवानांना कोरोनाची लागण

Subscribe

मुंबईतील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर तैनात असलेल्या सीआयएसएफच्या पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.

मध्य प्रदेशात एका बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. ही घटना ताजी असतानाच आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर तैनात असलेल्या सीआयएसएफच्या पाच जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या जवानांना ड्युटी दरम्यान कोरोनाची लागण झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. हे जवान पनवेल आणि कळंबोली येथे राहणारे असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेशमध्ये एका बीएसएफ जवानाला कोरोनाची लागण

मध्य प्रदेशाच्या ग्वालियर जिल्ह्यात टेकनपूर येथे बीएसएफ जवानांचे आधुनिक ट्रेनिंग सेंटर आहे. या सेंटरमधील एका अधिकाऱ्याची तपासणी केली असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. कोरोनाची लागण झालेल्या जवानाची पत्नी नुकतीच लंडनवरुन भारतात परतली होती. त्यामुळे पत्नीमुळे या जवानाला कोरोनाची लागण झाली असावी, असे सांगितले जात आहे.

- Advertisement -

हेही वाचा – धारावीत आढळला कोरोना रुग्ण


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -