अध्यात्मिक विचारांनी मन परिवर्तन; मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांचा राजकीय संन्यास

Aurangabad
harshwardhan jadhav
हर्षवर्धन जाधव

ऐन लॉकडाऊनच्या काळात मनसेला मोठा धक्का मिळाला आहे. मनसेचे नेता आणि औरंगाबादमधील माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या या घोषणेने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांनी एक व्हिडिओ जारी करून राजकारणातून निवृत्त होत असल्याचे सांगितले. त्यांनी नुकताच मनसेमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, त्यांनी आपला राजकीय उत्तराधिकारीदेखील घोषित केला असून पत्नी संजना हिला सर्व अधिकार दिले आहेत. तसेच जनतेने तिच्यामार्फत आपले प्रश्न सोडवावेत, शिवाय आपणही तिच्या पाठीशी असणार आहोत, असे जाधव यावेळी म्हणाले.

राजकारणातून निवृत्ती …

राजकारणातून निवृत्ती …माझी राजकीय वारसदार सौ संजना हर्षवर्धन जाधव

Harshwardhan Jadhav ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಮೇ 23, 2020

हर्षवर्धन जाधव म्हणाले की,

सध्या लॉकडाऊन सुरु आहे. अनेकजण आपापले छंद जोपासत आहे. मी देखील माझ्या अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो, त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला त्यातून झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे. माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल. याबाबत आपले जे काही प्रश्न असतील ते आपण संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत. प्रत्येक घरात कुरबुरी होत असतात. आमच्याही घरात झाल्या पण याचा अर्थ असा नाही की काही वेगळ्या गोष्टी घडत असतील. मी संजना यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे. रायबान जाधव यांच्या आशिर्वादाने आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात त्या निश्चित उत्तुंग भरारी मारतील. आपण सर्वांनी इथून पुढं राजकीय, सामाजिक किंवा शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क करावा. मी त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे, असे हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.

दोनदा आमदार म्हणून झाली निवड

हर्षवर्धन जाधव यांनी काही महिन्यांपूर्वी मनसेमध्ये प्रवेश केला होता. एकदा मनसे तर एकदा शिवसेनेकडून कन्नड मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसेच लोकसभा निवडणुकीत देखील ते औरंगाबाद लोकसभा क्षेत्रातून मैदानात होते. तिथेही त्यांचा पराभव झाला. मात्र त्यांना २ लाख ७३ हजार २३७ मतं मिळाली होती.

हेही वाचा –

अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; चीनच्या ३३ कंपन्यांना टाकलं काळ्या यादीत

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here