Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होण्याची शक्यता - हरदीपसिंग पुरी

ऑगस्टपूर्वी आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु होण्याची शक्यता – हरदीपसिंग पुरी

Subscribe

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी आज आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्ह येत ऑगस्टपूर्वी आपण आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करु असे संकेत दिले आहेत.

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी आज आपल्या अधिकृत फेसबुक पेजवर लाइव्ह येत महत्त्वाची माहिती दिली. यावेळी त्यांनी ऑगस्टपूर्वी आपण आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरु करु असे संकेत दिले आहेत. विमान सुरू करण्यापूर्वी कोरोना विषाणूच्या परिस्थितीचं मूल्यांकन केलं जाईल. ते म्हणाले की आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यासाठी विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपन्या पूर्णपणे तयार आहेत.

आतापर्यंत २५ हजार ४६५ भारतीयांना मायदेशात आणलं

आतापर्यंत वंदे भारत मिशन अंतर्गत २५ हजार ४६५ भारतीयांना परत आणले गेले असून मेच्या अखेरीस ही संख्या ५० हजारांच्या जवळपास जाईल. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी खासगी विमान कंपन्यांनीही एक प्रस्ताव पाठवला होता, जो आम्ही स्वीकारला आहे. त्यामुळे वंदे भारत ऑपरेशनमध्ये लवकरच खासगी विमान कंपन्यांची विमानांचा वापर करण्यात येणार आहे, असं नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी सांगितली. वंदे भारत उड्डाणांची संख्या वाढेल. लॉकडाऊन कालावधीत आठ हजार लोकांना परदेशातही पाठवलं गेलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. हे लोक परदेशात नोकरी करत होते.

आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्याचा सल्ला

- Advertisement -

हरदीपसिंग पुरी म्हणाले की त्यांनी सर्वांना आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करण्याची शिफारस केली आहे. हे एक उत्तम संपर्क ट्रेसिंग डिव्हाइस आहे. तथापि, आरोग्य सेतू अ‍ॅपवर ग्रीन स्टेटस असणार्‍या प्रवाशांना क्वारंटाइन करण्याची गरज ही आकलनापलीकडे आहे.


हेही वाचा – अमेरिकेचा चीनला मोठा धक्का; चीनच्या ३३ कंपन्यांना टाकलं काळ्या यादीत


२५ मे पासून ३३ टक्के देशांतर्गत विमान सेवा सुरु

- Advertisement -

नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी म्हणाले की, २५ मेपासून देशांतर्गत विमान सेवा सुरू होत आहे. विमान कंपन्यांनी तिकिट बुकिंगची सुविधा सुरू केली आहे. बुकिंगच्या पहिल्याच दिवशी बर्‍याच लोकांनी तिकिटे घेतली आहेत. विमान सेवेला मोठी मागणी आहे. त्या दृष्टीने, २५ मे पासून देशांतर्गत ३३ टक्के विमान सेवा सुरू होत आहे.

श्रीलंकेत अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या योजनाही आखल्या जात आहेत. त्यांना जहाज किंवा विमानाद्वारे घरी आणलं जाऊ शकतं. पहिलं लाईफलाईन उड्डाण देखील सुरू करण्यात आलं होतं, ज्याद्वारे देशभरात एक हजार टन वैद्यकीय उपकरणे आणि इतर आवश्यक सेवा पुरवल्या गेल्या.

 

- Advertisment -