घरमहाराष्ट्रनाशिकसीईटी परीक्षेसाठी ४ लाख अर्ज

सीईटी परीक्षेसाठी ४ लाख अर्ज

Subscribe

राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ही परीक्षा २ ते १३ मे दरम्यान घेतली जाणार आहे.

अभियांत्रिकी व फार्मसी अभ्यासक्रमातील बी. फार्म व फार्म डी. या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी राज्यातील ३ लाख ९६ हजार ६२४ विद्यार्थ्यांसमवेत देशभरातून ४ लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. राज्य सामूहिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत ही परीक्षा २ ते १३ मे दरम्यान घेतली जाणार आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात राज्यस्तरावरील कोट्यात प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे. जानेवारी ते मार्च दरम्यान सीईटीकरता ऑनलाईन अर्जाची मुदत होती. शुल्क भरण्यासह अर्ज दाखल करण्याची मुदत 3 एप्रिलपर्यंत होती. अर्ज दाखल करणार्‍यांमध्ये 1 लाख 71 हजार 445 मुली असून हे प्रमाण 41.48 टक्के आहे. 2 लाख 41 हजार 826 मुलांनी सीईटीचा अर्ज भरले असून हे प्रमाण 58.51 टक्के आहे. अर्ज करणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये 1262 अर्जदार विद्यार्थी दिव्यांग आहेत. इंग्रजी माध्यमात परीक्षेसाठी 4 लाख 6 हजार 286 विद्यार्थ्यांनी अर्जात नमूद केले आहे. मराठी माध्यमाकरता 5 हजार 831 तर उर्दु माध्यमात परीक्षेसाठी 1 हजार 167 विद्यार्थ्यांनी अर्ज भरला आहे.

- Advertisement -

यापूर्वी ही परीक्षा ऑफलाईन स्वरुपात होत असल्याने एका दिवसातच राज्यभरातील परीक्षा केंद्रावर परीक्षेचे आयोजित केले जायचे. यावर्षी प्रथमच ऑनलाईन स्वरुपात परीक्षा होत असल्याने 2 ते 13 मे दरम्यान संगणकावर आधारीत ही परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेकरता अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित (पीसीएम), भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र (पीसीबी) आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित व जीवशास्त्र (पीसीएमबी) असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. सीईटी परीक्षेसाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील विद्यार्थ्यांनीदेखील अर्ज दाखल केले आहेत.

जिल्हानिहाय प्राप्त अर्जांची स्थिती (जिल्हा व विद्यार्थीसंख्या)

पुणे————–३६३१६ 
नाशिक———–२१२६८
ठाणे————-२१४७८ 
मुंबई महानगर——१६९०० 
नगर————–२३३६५ 
औरंगाबाद———१६१४२ 
जळगाव———–१२५०० 
कोल्हापूर———-१४९०७ 
मुंबई शहर———७६८७ 
नागपुर————१९१०५ 
सोलापूर———–१८६६५

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -