Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक पैसे पाठवले बहिणीला, गेले भलतीकडेच

पैसे पाठवले बहिणीला, गेले भलतीकडेच

Subscribe

बहिणीच्या वयोवृद्ध सासर्‍यांच्या शस्त्रक्रियेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गंगापूर शाखेतील एका ग्राहकाने ३० मार्च रोजी ऑनलाइन तिच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावर ४५ हजार रूपये पाठविले. ग्राहकाने अनेकवेळा बहिणीच्या खात्यावर ऑनलाइन पैसे पाठविले असतानाही यावेळी पैसे दुसरीकडेच गेले.

बहिणीच्या वयोवृद्ध सासर्‍यांच्या शस्त्रक्रियेसाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या गंगापूर शाखेतील एका ग्राहकाने ३० मार्च रोजी ऑनलाइन तिच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यावर ४५ हजार रूपये पाठविले. ग्राहकाने अनेकवेळा बहिणीच्या खात्यावर ऑनलाइन पैसे पाठविले असतानाही यावेळी पैसे दुसरीकडेच गेले. याप्रकरणी ग्राहकाने बँक मॅनेजर व कर्मचार्‍यांकडे चौकशी असता ग्राहकाचीच चूक असे सांगण्यात आले. ग्राहकाने टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली, कस्टमर केअरला ई-मेल पाठवून सविस्तर तक्रार दिली. पण, आभाराशिवाय कोणतेच उत्तर मिळाले नाही. या सर्व प्रकारामुळे ग्राहकाला मनस्ताप झाला असून सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

प्रवीण गायकवाड (रा.नाशिक) यांच्या बहिणेचे ८० वर्षीय सासरे घरात तोल जाऊन पडले. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील खासगी रूग्णालयात शस्त्रक्रिया करण्याचे ठरले. शस्त्रक्रियेसाठी गायकवाड यांनी नेट बँकिंगने ४५ हजार रूपये स्टेट बँक ऑफ इंडिया, गंगापूर रोड शाखेतून बहिणीच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुंबई येथील खात्यात पाठवले. त्यांच्या खात्यातून ४५ हजार काढले गेले मात्र बहिणीच्या खात्यात जमा झाले नाहीत. त्यांनी चौकशी केली असता एसबीआय कानपूर (उत्तरप्रेश) शाखेतील मिश्रा नावाच्या खात्यावर जमा झाल्याचे समजले. गायकवाड यांनी बहिणीच्या बँक महाराष्ट्राच्या खात्यावर अनेकवेळा ऑनलाइन पैसे पाठविले असताना यावेळी मात्र दुसर्‍याच व्यक्तीच्या खात्यावर पैसे जमा झाले. याप्रकरणी त्यांनी एसबीआयच्या गंगापूर शाखेशी संपर्क साधला असता ग्राहकाचीच चूक झाली असून आपण पुन्हा ऑनलाइन व्यवहार तपासून घ्या, असे सांगण्यात आले. शेवटी गायकवाड यांनी मिश्रांशी सपर्क साधत संपर्क साधला. मिश्रांनी पैसे परत देण्याची तयारी दर्शवत एन्ट्री रिवर्स करून घेण्यास सांगितले. मात्र, गंगापूर शाखेने मिश्रां यांना बँकेस ईमेल करण्यास सांगा, असे सांगितले. त्यास मिश्रांनी नकार दिला. तसेच बँकेने ऑनलाइन व्यवहार स्वत: ग्राहकाने केल्याने बँकेची जबाबदारी नसल्याचे गायकवाड यांना सांगितले. गायकवाडांनी टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली, कस्टमर केअरला ईमेल पाठवून सविस्तर तक्रार दिली पण आभाराशिवाय कोणतेच त्यांना उत्तर मिळाले नाही.

बँकेची चूक नाही

- Advertisement -

गायकवाड यांनी केलेल्या ऑनलाइन व्यवहाराचे ४५ हजार होल्डवर ठेवण्यात आले आहेत. या ऑनलाइन व्यवहारात स्टेट बँकेची कोणतीच चूक नाही. संबंधित मिश्रांच्या खात्यातून ४५ हजार रुपये परत देण्यात यावेत, त्यांचा काही आक्षेप असल्यास त्याला मी जबाबदार असेल’ असा १०० रुपयांच्या बॉण्ड पेपरवर इंडेम्निटी करारनामा लिहून देण्यास गायकवाड यांना सांगितले आहे. तो मिळताच त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले जाणार आहेत. राजेश शर्मा, मॅनेजर, गंगापूर शाखा, स्टेट बँक ऑफ इंडिया

पोलीस ठाण्यात तक्रार

बहिणीचा महाराष्ट्र बँकेचा खाते क्रमांक आणि कानपूरच्या एसबीआय खात्यात पैसे गेले तो खाते क्रमांक एकच असल्याचे समजले आहे. ऑनलाइन फंड ट्रान्सफर पर्यायात एसबीआय बँक ट्रान्सफर व अन्य बँक्स ट्रान्सफर या दोन प्रकारच्या बेनिफिशरी याद्या होत्या. दोन्हीही याद्यांची पाहणी केली तेंव्हा बहिणीच्या खात्याचा तपशील दोन्हीकडे दिसला. ही एसबीआय नेटबँकिंग सिस्टीमची चूक आहे. याप्रकरणी ग्राहक मंचाकडे एसबीआयविरुद्ध तक्रार दाखल करणार आहे. मंगळवारी (ता.९) सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला असून प्रत पोलीस आयुक्त कार्यालयास दिली आहे.
प्रमोद गायकवाड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -