राष्ट्रवादीचे १२ उमेदवार जाहीर, राजू शेट्टींना हातकणंगलेची जागा

Mumbai
Jayant Patil NCP
जयंत पाटील पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आगामी लोकसभा निवडणुकांसाठीच्या महाराष्ट्रातील १२ उमेदवारांची यादी अखेर जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही यादी जाहीर केली. यामध्ये अपेक्षेनुसार विद्यमान खासदार सुप्रिया सुळे, उदयनराजे भोसले, धनंजय महाडिक, मोहम्मद फैजल अशा उमेदवारांना तिकिट देण्यात आलं आहे. तर सुनील तटकरे यांना रायगडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर मावळ, माढा आणि अहमदनगरचा उमेदवार कोण असणार याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. तसेच, हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटना अर्थात राजू शेट्टींसाठी सोडण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या बुलढाणा आणि वर्धा या जागांच्या मागण्या मान्य न करण्यात आल्याचं बुलढाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना दिलेल्या उमेदवारीवरून स्पष्ट झालं आहे.

सुनील तटकरे – रायगड
सुप्रिया सुळे – बारामती
उदयनराजे भोसले – सातारा
धनंजय महाडिक – कोल्हापूर
राजेंद्र शिंगणे – बुलढाणा
गुलाबराव देवकर – जळगाव
राजेश बिटेकर – परभणी
संजय दीना पाटील – मुंबई उत्तर पूर्व
आनंद परांजपे – ठाणे
बाबाजी पाटील – कल्याण
मोहम्मद फैज – लक्षद्वीप
स्वाभिमानी शेतकरी संघटना – हातकणंगले

हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाठिंबा दिला आहे. उर्वरित उमेदवारांची यादी उद्या आणि परवा जाहीर करण्यात येईल अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. तसेच बीड, अहमदनगर उमेदवाराबाबत चर्चा झाली आहे. लवकरच हीसुद्धा नावे जाहीर केली जातील, असेही आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here