घरदेश-विदेशलुधियानातील मतदार यादीत मयत मतदारही जिवंत

लुधियानातील मतदार यादीत मयत मतदारही जिवंत

Subscribe

लुधियाना येथील मतदार यादीत दोन मतदारांचे वय २६५ वर्षे आणि एका मतदाराचे वय १४४ असल्याचे आढळून आले आहे. या मतदारांच्या मृत्यूनंतरची अनेक वर्षे त्यांचे नाव काढण्यात आले नाही.

देशात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. निवडणुकीच्या प्रचाराला पक्ष सज्ज झाले आहे. निवडणुकीकाळात महत्वाची ती मतदार यादी. मतदार संघात राहणाऱ्या लोकांची नावे या यादीत दिलेली असतात. यामध्ये वयाची अठरा वर्षे पुर्ण झालेले नवे मतदार तर मयत झालेल्या मतदारांची नावे काढली जातात. असा नियम असताना देखील लुधियाना येथील मतदार यादीत एक नवीच घोळ समोर आला आहे. लुधियानामधील मतदार यादीत दोन मतदारांचे वय २६५ तर एकाचे वय १४४ असल्याचे आढळून आले आहे. या उघड झालेल्या माहितीनंतर निवडणूक आयोगालाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. मागील अनेक वर्षांपासून या मतदारांचे नाव निवडणूक यादीतून काढण्यात आले नसल्यामुळे हा घोळ झाला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

पाच हजारहून अधिक मतदारांनी पार केली शंभरी

लुधियाना जिल्ह्यात एकूण ८६३ मतदारांच्या वयात शंका व्यक्त केली जात आहे. यादीत अमृतसर येथे ५५८ आणि होशियारपूर येथील ४४९ मतदारांचे वय १०० वर्षे असल्याचे आढळून आहेत. निवडणूक आयोगाचे अधिकारी एस. के. राजू यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल ५ हजार ९१६ मतदार शंभरीहून अधिक वयाचे आहेत. या गोंधळामुळे आता निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जाऊन याची चौकशी करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -