घरताज्या घडामोडीयेत्या दिवसात राज्यात पाऊस आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता

येत्या दिवसात राज्यात पाऊस आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता

Subscribe

भारतीय हवामान विभागाने दक्षिण पश्चिम मॉन्सून हा सक्रीय झाला असून आता भारताच्या काही भागात पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात भारताच्या दक्षिण पश्चिम भागात तसेच पश्चिम भारतात मॉन्सून अधिक वेगाने प्रवेश करण्याचे संकेत आहेत. येत्या २४ तासांमध्ये उत्तरराखंड, उत्तर प्रदेश आणि राजस्थानात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण पश्चिम मॉन्सूनसाठी आता पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे कर्नाटक, तामिळनाडू, पॉंडेचेरी, करईकल यासारख्या पट्ट्यात मॉन्सूनचा वेग वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रादेशिक हवामान विभागाने दक्षिण पश्चिम मॉन्सून हा केरळमध्ये १ जूनला दाखल होईल असा अंदाज मांडला होता. तर मुंबईत ११ जूनला मॉन्सून दाखल होईल असे संकेत आयएमडीने दिले आहेत. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि कर्नाटक याठिकाणी पाऊस आणि वादळीवारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे प्रमाण कमी अधिक असेल असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

येत्या चार ते पाच दिवसात मात्र गुजरात, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या भागात पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर केरळ, कोकण, कर्नाटक आणि गोवा याठिकाणी येत्या २४ तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि दक्षिण राजस्थान यासारख्या भागात कमी अधिक प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतात सरासरी ५० टक्के भागात शेतीसाठी मॉन्सूनची हजेरी महत्वाची असते. विशेषतः तांदूळ, मका, ऊस, कापुस, गहू, सोयाबीन यासाऱख्या पिकासाठी पावसाची हजेरी महत्वाची असते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -