घरदेश-विदेशसन फार्माने सुरू केली 'या' औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल टेस्ट; २१० रुग्णांवर...

सन फार्माने सुरू केली ‘या’ औषधाच्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल टेस्ट; २१० रुग्णांवर तपासणी

Subscribe

देशातील १२ केंद्रांवर २१० रूग्णांमध्ये या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या केल्या जाणार

जगभरात कोरोना व्हायरसचा कहर सुरू असताना दिवसेंदिवस कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. अशा परिस्थितीत कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच देशातून कोरोनावर उपचार व्हावे, यासाठी सर्वच वैज्ञानिक प्रयत्न करत आहेत. कोरोनाविरोधात प्रभावी अशी लस किंवा औषध अद्याप नाही. सध्या इतर आजारांवर जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांची कोरोना रुग्णांवर चाचणी करणं सुरू आहे.

कोरोना रुग्णांच्या संभाव्य उपचारांसाठी वनस्पती निर्मित औषध एक्यूसीएचचा परिणाम शोधण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचणी सुरू केली असल्याचे औषधनिर्माण करणारी संस्था सन फार्मास्युटिकल्स इंडस्ट्रीजने शुक्रवारी सांगितले. सन फार्माने दिलेल्या निवेदनात म्हटले की, औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतीपासून तयार केलेल्या औषधाची चाचणी घेण्यासाठी कंपनीला यावर्षी एप्रिलमध्ये ड्रग कंट्रोलरकडून परवानगीही मिळाली आहे.

- Advertisement -

कंपनीकडून असे सांगण्यात आले की, “देशातील १२ केंद्रांवर २१० रूग्णांमध्ये या औषधाच्या क्लिनिकल चाचण्या केल्या जाणार आहेत. रुग्णांसाठी उपचाराचा कालावधी १० दिवस असणार असून ऑक्टोबर २०२० पर्यंत क्लिनिकल चाचणीचा निकाल अपेक्षित आहे. तसेच “सन फार्माने म्हटले की, माणसांमध्ये एक्यूसीएच सुरक्षित असल्याचे अध्ययन पूर्ण झाले आहे आणि हे औषध दुसर्‍या टप्प्यातील चाचणीसाठी सुरक्षित असल्याचे आढळले आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार, एक्यूसीएच डेंग्यूसाठी विकसित केले गेले आहे आणि नियंत्रित वातावरणात विषाणूंवर केलेल्या अभ्यासानुसार विषाणू प्रतिबंधक असल्याचे दिसून आले आहे. म्हणूनच कोविड -१९ च्या उपचारांना पर्याय म्हणून या औषधाची चाचणी घेण्यात येत आहे.


भारतात कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी दिलं जाणार अमेरिकेचं औषध!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -