घरमहाराष्ट्रघरफोड्यांच्या टोळीचा जिल्ह्यात धुमाकूळ !

घरफोड्यांच्या टोळीचा जिल्ह्यात धुमाकूळ !

Subscribe

तिघांना मध्य प्रदेशातून अटक

दक्षिण रायगड भागात चोरी व घरफोडी करणार्‍या आंतरराज्य टोळीतील तिघांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मध्य प्रदेशातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 31 तोळे सोन्याचेे, तर 300 ग्रॅम चांदीचे दागिने, 4 मोटरसायकली असा एकूण 11 लाख 23 हजार रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सुनील लालसिंग मुझालदा (23, रा. घोर, पो. टाडा, ता. कुक्षी, जि.धार), रवी उर्फ छोटू मोहन डावर (18, रा. जवार टेकडी, ता. जि. इंदोर) व कपिल गजेंद्र पांचोली उर्फ जैन (18, रा.बोरी, ता.जोबट, जि.अलिराजपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी पेण, माणगाव, पाली, गोरेगाव, मुरुड, रोहे, महाड शहर पोलीस ठाण्याकडील एकूण 12 गुन्हे, तर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड 3 व चिपळूण पोलीस ठाण्याकडील 3, पुणे जिल्ह्यातील भोर पोलीस ठाण्याकडील 1 व अहमदनगर जिल्ह्यातील लोणी पोलीस ठाण्याकडील 2 असे एकूण 21 घरफोड्यांसह चोरी केल्याची कबुली दिली, अशी माहिती रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- Advertisement -

रायगड जिल्ह्यात चोरी व घरफोड्यांचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जमील शेख यांनी घडलेल्या गुन्ह्यांचा सर्वप्रथम आढावा घेत गुन्हेगारांची गुन्हे करण्याची कार्यपद्धती, गुन्हे करण्याचे ठिकाण, दिवस व वेळा यांचा सर्वसमावेशकपणे आढावा घेऊन विश्वासू खबरे सक्रिय केले. गुन्हे घडलेल्या ठिकाणाचे तांत्रिक विश्लेषण करून सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यात आले. चोरी केल्यानंतर तेथे दगड ठेवला जात असे. त्यामुळे आरोपी हे मध्य प्रदेशच्या धार, इंदोर व अलीराजपूर या वेगवेगळ्या जिल्ह्यातील असल्याने निष्पन्न झाले. पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांच्या नेतृत्त्वाखाली एक तपास पथक तयार करून मध्य प्रदेशमध्ये पाठवले. या पथकाने आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -