घरमुंबईकरण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे निर्माता क्षितीज प्रसाद अटकेत; NCB ची कारवाई

करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनचे निर्माता क्षितीज प्रसाद अटकेत; NCB ची कारवाई

Subscribe

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या तपासातून बॉलीवूडमधील ड्रग्ज अँगलसमोर आले असून त्यातून मोठे मासे एनसीबीच्या गळाला लागत आहेत. एनसीबीने चौकशी दरम्यान धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज रवी प्रसाद याला आधी ताब्यात घेतले. त्यानंतरही झालेल्या चौकशीत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने अखेर २७ तासांच्या चौकशीनंतर क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

काय आहे घटनाक्रम

एनसीबीच्या टीमने शुक्रवारी क्षितीजला चौकशीसाठी बोलवले होते. त्यानंतर रात्री त्यांना ताब्यात घेतले गेले. जवळपास २७ तास त्याची कसून चौकशी झाली. त्यानंतर क्षितीजला अटक करण्यात आली आहे. क्षितीजने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुंबईत चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्याशिवाय क्षितीजच्या चौकशीदरम्यान त्याने अनेक मोठ्या नावांचाही खुलासा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, बॉलीवूड तारका दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींची आज, शनिवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कसून चौकशी सुरु आहे. त्याशिवाय दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे. तर काल अभिनेत्री रकूल प्रीत सिंहचीही चौकशी एनसीबीकडून करण्यात आली.

या सर्व प्रकरणानंतर चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याने एक पत्रक जारी केले आहे. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असे करण जोहरने स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Covid Efforts: मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल ठरले IACC चे मानकरी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -