घरक्रीडाअश्विनच्या मागे साडेसाती

अश्विनच्या मागे साडेसाती

Subscribe

कसोटीनंतर आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात ?

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या संघात फिरकीपटू आर. अश्विनला वगळल्यानंतर आता अश्विनची आयपीएलमधील कारकिर्दही धोक्यात आल्याचे म्हटले जात आहे. अश्विन हा किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार आहे. पण त्याचे पंजाबच्या संघाचे कर्णधारपद काढून घेण्यात येणार असून त्याला संघातूनही डच्चू देण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. संघाच्या या कामगिरीवर पंजाबच्या संघाची एक बैठक या आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या बैठकीमध्ये अश्विनला संघात न ठेवण्याचा निर्णय घेण्यात येऊ शकतो, असे म्हटले जात आहे. तसेच अश्विननंतर संघाचे नेतृत्व कोणाकडे द्यायचे, या गोष्टीचा चर्चा या बैठकीमध्ये होणार असल्याचे समजते आहे.अश्विनला भारताच्या ट्वेन्टी-20 आणि एकदिवसीय संघात स्थान मिळालेले नाही. अश्विन हा फक्त भारताच्या कसोटी संघात आहे. पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी देण्यात आलेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -