घरक्रीडाप्रीतीचा पुन्हा भडका, यावेळी मंत्री महोदय लक्ष्य!

प्रीतीचा पुन्हा भडका, यावेळी मंत्री महोदय लक्ष्य!

Subscribe
पंजाब संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण ताजे असतानाच प्रीती झिंटा आणखी एका वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. आयपीएलच्या ११ व्या सिजनमध्ये प्रीती आता एका मंत्र्यांवर भडकलेली आहे. पंजाब संघाचे यावेळी होम ग्राऊंडचे सामने दोन मैदानावर होत असल्याने पहिल्या टप्प्यात मोहालीमध्ये सामने पार पडल्यानंतर आता इंदौरमध्ये सामने होत आहेत. सामन्यापूर्वी घेतल्या गेलेल्या एका पत्रकार परिषदेत प्रीती झिंटा भडकली. या रागात तिने सरकारी अधिकाऱ्यांवर काही आरोपही केले. प्रीतीचा संघ हा आयपीएल हरत असल्यामुळे तीचा राग वाढत जात असल्याची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली आहे.
मध्य प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याला सामन्याचे व्हीआयपी तिकीट मिळाले नाही. त्यामुळे रागात त्या मंत्र्याने मैदानाकडे जाणारा रस्ता बंद केला. त्याचप्रमाणे आपल्या विभागातील जागांवर पार्किंगही थांबवली. या सर्व प्रकरणामुळे प्रीती झिंटाला राग अनावर झाला. पत्रकार परिषद घेऊन प्रीतीने मध्य प्रदेश सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सरकारी आधिकाèयांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पंजाब संघाचे सीईओ सतीश मेनन यांनी सांगितले की, प्रत्येक सामन्याला सरकारी अधिकारी ६० ते ७० लाख रुपयापर्यंतची तिकिटे मागतात.
यापूर्वीही प्रीती झिंटा आणि विरेंद्र सेहवाग या दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. आयपीएलच्या सामन्यादरम्यान पंजाबला पराभव पतकारा लागला होता. सेहवागला या  पराभवासाठी जवाबदार ठरवत त्याची चांगलीच शाळा घेण्यात आली. तीच्या या वर्तनामुळे सेहवागही संघ सोडून जाण्याची चर्चा होती. प्रसारमाध्यमांमध्ये ही बातमी झळकल्या नंतर प्रीतीने ट्वीटरवरुन याचे स्पष्टीकरण देत ही खोटी बातमी असल्याचे म्हटलं होतं.

सगळीकडेच नाराजी

मोहालीमध्ये कमीतकमी ५०० रुपये असणारे तिकीट इंदौरमध्ये ९०० रुपये असल्यामुळे चाहते नाराज आहेत. तर पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे प्रशासन नाराज आहे. त्याचप्रमाणे व्हीआयपी तिकीट न मिळाल्यामुळं मंत्री नाराज आहेत. दरम्यान, काल मुंबई विरोधात झालेल्या सामन्यात पंजाबला तीन धावांनी निसटक्या पराभवचा सामना करावा लागला. राहुलने ९४ धावांची वादळी खेळी केली.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -