घरटेक-वेकआता विमानातही बोला मोबाईलवर, वापरा इंटरनेट!

आता विमानातही बोला मोबाईलवर, वापरा इंटरनेट!

Subscribe

येत्या १५ ऑगस्टपासून विमानप्रवासातही आता मोबाईलचा वापर करता येणार आहे. इतकंच नाही तर, फ्लाईटमध्ये आता इंटरनेटचाही वापर करता येणार आहे.

विमानातून प्रवास करणाऱ्यांसाठी आता खुशखबर आहे. येत्या १५ ऑगस्टपासून विमानप्रवासातही आता मोबाईलचा वापर करता येणार आहे. इतकंच नाही तर, फ्लाईटमध्ये आता इंटरनेटचाही वापर करता येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दूरसंचार विभागानं इनफ्लाईट कनेक्टिव्हिटीसाठी गाईडलाईन्स तयार केली आहे. यावर आता गृहमंत्रालयाकडून मत मागवण्यात आलं आहे. यावरील अंतिम गाईडलाईन ऑगस्टमध्ये येण्याची शक्यता आहे. सर्व काही वेळेवर झाल्यास, १५ ऑगस्टपासून विमानामध्ये तुमचा मोबाईलदेखील चालू राहू शकणार आहे.

कंपन्यांना वेगळा परवाना घ्यावा लागेल

ट्रायच्या शिफारशीनुसार, ज्या कंपन्यांना विमानात ही सुविधा द्यायची आहे, त्यांना यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागेल. प्रस्तावानुसार, ही सुविधा भारतीय वायुसेनेच्या अंतर्गत दोन्ही देशांतर्गत आणि परदेशी प्रवाशांना उपलब्ध असेल. या सुविधेसाठी सरकारला सध्याच्या टेलिग्राफ अॅक्टमध्येदेखील बदल करावा लागेल.

- Advertisement -

१ रुपयात मिळणार परवाना

स्पाईसजेट आणि जेट एअरवेज सेवा देण्यासाठी आपण उत्सुक असल्याचं आधीच सांगितलं होतं. या फ्लाईट सर्व्हिस प्रोव्हायर्सना १ रुपयात परवाना मिळणार आहे. मात्र, या सुविधेमध्ये टेक – ऑफ आणि लँडिंगच्या वेळी मोबाईलवर बोलता येणार नाही. विदेशी एअरलाईन्समध्ये ही सेवा प्रथम सुरु करण्यात येईल. भारतात अजूनही गाईडलाईन्स नसल्यामुळं ही सेवा देता येत नव्हती.

खास टेक्नीकनं चालणार मोबाईल

खास तंत्र ‘मोबाईल कम्युनिकेशन सर्व्हिस ऑन बोर्ड एअरक्राफ्ट’ च्या सुविधेनं आता विमानातही मोबाईलवरून कॉल करणं अथवा डेटा वापरणं सोपं होणार आहे. ही सुविधा आल्यानंतर आता जगभरातील ३० प्रमुख एअरलाईन्स कंपन्या प्रवाशांना विमानात कॉल आणि नेटची सुविधा द्यायला लागल्या आहेत. विमानात मोबाईल नेटवर्क एका पोर्टेबल टॉवरच्या मदतीनं चालू शकतो. हे मशीन टेलिकॉम कंपन्यांच्या मदतीनं एअरलाईन्स कंपन्या लावू शकतात.

- Advertisement -

ट्राय अॅक्टमध्ये संशोधन होणार

लोकपाल ट्रायअंतर्गत गठित करण्यात येईल आणि त्यासाठी ट्राय अॅक्टच्या संशोधनाची गरज भासेल. ट्रायच्या म्हणण्यानुसार, तीन महिन्यात साधारण १ कोटीच्या आसपास तक्रारी येतात. नव्या तंत्रानुसार, युजर्सच्या तक्रारींचे लवकरात लवकर आणि समाधानकारक निराकरण होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -