आता ‘गुगल पे’वरुन करा रेल्वे तिकिट बुक

गुगल पे या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून आता युजर्स तिकिटही बुक करु शकणार आहेत. त्यामुळे प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

Mumbai
google pay use for train ticket online booking
गुगल पे'वरुन करा रेल्वे तिकिट बुक

भारतात मोठ्या संख्येने नागरिक डिजिटल पेमेंटचा वापर करतात. या पेमेंट अॅपमध्ये गुगल पे हे सर्वात लोकप्रिय पेमेंट अॅप्लिकेशन आहे. आजवर या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून युजर्स समोरच्या व्यक्तीला सहज पैसे पाठवू शकत होते. तसेच बऱ्याचदा या अॅप्लिकेशनद्वारे Goibibo, RedBus, Uber, Ola, Yatra यांसाख्या खासगी प्रवासी वाहनांची बुकिंग देखील करता येते. मात्र आता ‘गुगल पे’वरुन ट्रेनच्या तिकीट बुकिंगचीही सुविधा देण्यात आली आहे. Android व IOS या दोन्ही प्रकारच्या ऑप्रेटिंग सिस्टमध्ये ही सुविधा आपण वापरु शकतो. तिकीट बुकिंसाठी ‘गुगल पे’ मध्ये ‘बुक ट्रेन तिकिट’ (Book Train Tikits) हा पर्याय देण्यात आला आहे. या पर्यायाद्वारे ट्रेनमधील कोणत्या जागा रिकाम्या आहेत? आणि स्टेशनमधील अंतर किती आहे? याबाबत योग्य माहिती आपल्याला मिळते.

अशी बुक करा तिकिट

  • तिकीट बुक करण्यासाठी Google Pay च्या Business सेक्शनवर क्लिक करा. त्यावर तुम्हाला Book train tickets चा पर्याय दिसेल.
  • Book train tickets वर क्लिक केल्यानंतर कुठून कुठे आपल्याला प्रवास करायचा आहे याबाबत माहिती भरावी.
  • आपण भरलेल्या माहितीनुसार आपल्याला ट्रेनची एक यादी मिळते. त्यात आपण आपल्याला हव्या असलेल्या ट्रेनमधील सीटची उपलब्धता आणि प्रवासी भाडे तपासून पाहू शकतो.
  • या यादीतील योग्य पर्यायावर क्लिक करावे आणि पॅसेंजर डिटेल्स भरावे. त्यानंतर Continue वर क्लिक करा.
  • बुकिंग कन्फर्मेशनची विचारणा आता करण्यात येईल. त्यानंतर पेमेन्ट मोड सिलेक्ट करून Continue करा.
  • आता आपला UPI PIN एन्टर करावा लागेल. त्यानंतर IRCTC वेबसाईटवर रिडायरेक्ट करण्यात येईल. येथे IRCTC पासवर्ड भरावा लागेल. त्यानंतर SUBMIT वर क्लिक करा.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here