घरटेक-वेकसाऊंड वनचा व्ही -९ हेडफोन भारतात

साऊंड वनचा व्ही -९ हेडफोन भारतात

Subscribe

साऊंड वन कंपनीने व्ही -९ हा वायरलेस कनेक्टीव्हिटी असणारा हेडफोन भारतीय ग्राहकांसाठी बाजारपेठेत उबलब्ध केला आहे.साऊंड वन ही हाँगकाँगमधील कंपनी असून त्यांनी आजवर भारतीय ग्राहकांसाठी विविध प्रॉडक्ट लाँच केले आहेत. यात आता व्ही ९ या हेडफोनची भर पडली आहे. वर नमूद केल्यानुसार हा वायरलेस या प्रकारातील हेडफोन आहे. याची डिझाईन ही अतिशय आकर्षक आणि आरामदायी अशी आहे. हा हेडफोन फोल्ड होऊ शकतो. यामुळे याला कुठेही सहजपणे वापरणे शक्य आहे. यात ब्ल्यूटुथ ५.० ची कनेक्टीव्हिटी दिलेली आहे. यामुळे याला स्मार्टफोनसह अन्य स्मार्ट उपकरणांशी संलग्न करून वापरता येणार आहे. याची रेंज १० मीटरपर्यंतची असल्याचे कंपनीने नमूद केले आहे. यात इनबिल्ट मायक्रोफोन प्रदान करण्यात आला असून याच्या मदतीने आलेला कॉल रिसिव्ह करता येणार आहे.

साऊंड वनच्या व्ही ९ या वायरलेस हेडफोनमध्ये ५०० मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी असून ती एकदा चार्ज केल्यानंतर आठ तासांचा बॅकअप देण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यात मायक्रो-एसडी कार्डचा सपोर्ट असल्याने कुणीही कार्डमधील गाण्यांचा आनंद घेऊ शकणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे यात ऑक्झ-इन पोर्ट दिले असल्याने याला वायर्ड या प्रकारातही वापरता येणार आहे. या हेडफोनचे मूल्य १,३९० रूपये असून याला अमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि पेटीएमवरून उपलब्ध करण्यात आलेले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -