Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर व्हिडिओ सांगलीच्या गोविंदकाका परांजपेचे सायकल प्रेम

सांगलीच्या गोविंदकाका परांजपेचे सायकल प्रेम

Mumbai

सांगलीतील ८२ वर्षीय गोविंदकाका परांजपे यांनी सायकलने सांगली ते नांदेड हा ४५० किमीच्या प्रवासाला सुरुवात केलीय. नांदेड येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरीकांच्या संमेलनासाठी गोविंदकाका परांजपे  हे सांगलीहून निघाले आहेत. ४५० किमीचे अंतर पार करत १५ डिसेंबर रोजी नांदेडमध्ये सुरू होणाऱ्या राष्ट्रीय ज्येष्ठ नागरीकांच्या नांदेड संमेलनासाठी ते उपस्थित राहणार आहेत. वयाची ८० वर्ष उलटली तरी देखील कित्येक किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून पूर्ण केला आहे. यापूर्वी  मे २०१९ मध्ये  सायकलवर Sea to Sky हा नेपाळ दौरा परांजपे यांनी सुरू केला. मागील ५ वर्षांमध्ये लखनौ, इंदोर, नागपुर असा देखील प्रवास परांजपेनी सायकलवरून केलाय.