घरव्हिडिओधुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत नक्की कोण जिंकलं?

धुळे-नंदुरबार पोटनिवडणुकीत नक्की कोण जिंकलं?

Related Story

- Advertisement -

धुळे-नंदुरबार विधान परिषद पोट निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपचे अमरिश पटेल यांनी एकहाती विजय मिळवला आहे. महाविकासआघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांना तब्बल २३४ मतांच्या आघाडीने हरवत अमरिश पटेल यांनी तिसऱ्यांदा विधानपरिषद आमदारकी जिंकली आहे. याआधी २००९ आणि २०१५मध्ये ते याच मतदारसंघातून आमदार झाले होते. मात्र, अवघ्या वर्षभरापूर्वीच अमरिश पटेल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्याधी तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ काँग्रेसकडून त्यांनी हा मतदारसंघ बांधला आहे. त्यामुळे हा विजय भाजपचा की अमरिश पटेल यांचा? हा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.

- Advertisement -