खासगी रुग्णालयाच्या मनमानीला पालिका आयुक्त जबाबदार? भाजपचे आंदोलन

MUMBAI

कोरोनाबाधित रुग्णांकडून खासगी रुग्णालये मोठ्या प्रमाणात आर्थिक लूटमार करत असून मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोणतीही हालचाल केली नाही. तसेच ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजवाणी देखील करत नसल्याचा आरोप करत आज भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर धरणे आंदोलन दिले.