मंदिरे उघडण्याबाबत जनतेला काय वाटते?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून बंद असणारी मंदिरे खुली करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ही राज्यातील सर्व मंदिरे आणि सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडणार आहेत. कोरोनाशी संबंधित सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अटीवर हा प्रवेश देण्यात आलेला आहे. याबाबत नागरिकांच्या काय प्रतिक्रिया आहेत जाणून घेऊया.