CAAवर काँग्रेस अजूनही ठाम, पृथ्वीराज चव्हाणांची स्पष्टोक्ती

Mumbai

CAA अर्थात नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत वेगवेगळ्या भूमिका घेतल्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधल्या काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये विसंवाद निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधिमंडळात बोलताना काँग्रेसच्या सीएएविरोधी भूमिकेवर स्पष्टीकरण दिलं.