समृद्धी महामार्ग प्रकल्पाचा चौकशी अहवाल पुन्हा चर्चेत

Mumbai

समृद्धी महामार्ग प्रकल्पाची अंतिम सूचना काढल्यानंतर काही तत्कालीन लोकप्रतिनिधींनी त्यांच्या किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या नावे महामार्गालगतच्या जमिनी खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यासंदर्भात तत्कालीन सरकारने समिती नेमून चौकशी केली होती. त्याचा अहवाल जाहीर करण्याची मागणी काँग्रेस आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.