भाविकांसाठी मंदिर केव्हा सुरु होणार?

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. राज्यातील रेस्टॉरंट, हॉटेल आणि बार ५ ऑक्टोबरपासून सुरु झाले आहे मात्र, मंदिरं सुरु करण्यासंदर्भात राज्य सरकारनं अजूनही परवानगी दिली नसल्याने भाविकांसाठी मंदिरांचे दार बंदच राहणार आहे. सरकारच्या या कारभाराविरोधात मंदिर ट्रस्टसह भाविकांमध्ये प्रंचड नाराजी आहे. राज्यभरातील मंदिरावर अनेक घटक अवलंबून आहेत. गेल्या सहा महिन्यापासून धार्मिक स्थळे बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्य सरकारने ज्याप्रमाणे तळीरामासाठी मद्यालय सुरु केली.त्याच प्रमाणे आता सर्व धार्मिक स्थळे सुर करण्याची मागणी भाविकांकडून करण्यात आली आहे.