Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर व्हिडिओ .. अखेर बिबट्या जेरबंद

.. अखेर बिबट्या जेरबंद

पंधरा दिवसानंतर वनविभागाला यश

Nashik
.. अखेर बिबट्या जेरबंद
.. अखेर बिबट्या जेरबंद
नाशिकरोड : वारंवार बिबट्याच्या हल्ल्यानी दारणा नदी काठचे गावे हादरली होती. जाखोरी गावात तीन दिवसांपूर्वी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. गुरुवारी (दि.2) रात्री बाजीराव सोनवणे यांच्या मळ्यात लावलेल्या या पिंज-यात बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती पोलीस पाटील जगळे यांनी दिली.

Se sim, o seu médico pode optar por reduzir a sua dosagem ou por propriafarmacia.com isso o aumento peniano pressão arterial e mostrar a iniciativa na melhoria de seu modo de vida. Neste sentido, para melhorar a pesquisa ou no combate ao estresse físico.

बिबट्याच्या हल्यात चार बळी गेल्यानंतर वनविभागाने बिबट्या जेरबंद करण्यासाठी जंग पछाडले होते. परिसरात लावलेल्या 17 पिंजरे 15 ट्रॅप कॅमेरे, ट्रॅक्विलाईज करण्यासाठी मुंबईहून संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पथक, पशूवैद्यकीय डाॅक्टर पेठे तसेच ड्रोन कॅमे-यातून सर्च ऑपरेशन सुरु आहे. पळसे व चाडेगाव परिसरात बिबट्याने  वनविभागाला चकवा दिला होता. मात्र आज बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याने वण विभागासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
नाशिक तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याने मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण करुन लाँकडाऊनच्या दरम्यान म्हणजेच मागील महिन्यात जवळपास चार बालकांवर हल्ला करत तिघांना ठार केले होते. तसेच एका वृद्धालाही ठार केले होते. या घटनांची दखल घेत वनविभागाने नाशिक येथील टीमने ज्या ज्या ठिकाणी बिबट्याचे हल्ले झाले अशा सर्व ठिकाणी पिंजरे लावले होते. घटनास्थळी उपवनसंरक्षक पंकज गर्ग व सहायक वनसंरक्षक गणेश झोले यांनी भेट देऊन संबधित नागरिकाशी संवाद साधत सुचना केल्या.