राज्यातला पहिला ‘पोस्ट कोविड सेंटर’ प्रकल्प ठाण्यात तयार!

जगभरात कोरोनाचा फैलाव सुरू असताना सगळीकडेच प्रामुख्याने काम सुरू आहे ते कोरोना सेंटर्सवर. कोविड सेंटर, कोविड हॉस्पिटल या ठिकाणी कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र, कोरोनातून बरे झाल्यानंतर देखील अनेकांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो. मात्र, अशा समस्यांवर या कोविड सेंटर्सवर किंवा कोविड हॉस्पिटल्समध्ये उपचार होत नाहीत. खास अशा लोकांसाठी ठाण्यामध्ये राज्यातलं पहिलं पोस्ट कोविड सेंटर सुरू करण्यात आलं आहे. यामुळे कोरोनातून बरे झाल्यानंतरही ग्रासणाऱ्या समस्यांवर रुग्णांना उपचार घेणं सहज सुलभ होणं शक्य होणार आहे.