किंग्जसर्कलचा पादचारी पूल प्रवाशांसाठी बंद

Mumbai

एलन्फिस्टन, अंधेरीतील गोखले पूल दूर्घटनेनंतर पालिका आणि रेल्वे प्रशासनाला जाग आली. त्यानंतर, मुंबईतील पूलांचं ऑडिट केलं गेलं आणि अनेक पूलांच्या दुरुस्तीच्या कामांना सुरुवात झाली. पण, आजही मुंबईतील अनेक पूल धोकादायक आहेत. असाच किंग्जसर्कल येथील पादचारी पूल पालिकेकडून दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आला आहे. यावर पर्यायी व्यवस्था म्हणून प्रवाशांसाठी बेस्टने मोफत सेवा सुरू केली आहे. हा पूल दुरुस्त होईपर्यंत ही सेवा दिली जाणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here