उद्धव साहेबांनी मला काम दिलंय; शिवसेनेच्या खासदाराचा कंत्राटदाराला दम

विदर्भातील शिवसेनेच्या एका खासदाराने समृद्धी महामार्ग प्रकल्पातील रस्त्याचे एक कंत्राट मिळवण्यासाठी कंत्राटदाराला फोन वरुन ‘समज’ देत ते काम सोडण्याचे आदेश दिले. संबंधित कंत्राटदार आणि शिवसेनेच्या खासदारामधील हा संवाद सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा वापर करत खासदार कंत्राटदारावर कसा दबाव टाकत असल्याचे दिसून येत आहे.