तरुणाचा भयानक स्टंट; पाहून तुम्हालाही भरेल धडकी

थरकाप उडवणार्‍या स्टंटबाजीचे व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर अपलोड करण्याची स्पर्धा जणू तरुणांमध्ये लागली असल्याचे दिसून येत आहे. सध्या कांदिवलीमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत तरुण एका इमारतीच्या छतावर स्टंट करताना दिसत आहे.