लग्नाला चार वर्षे झाली तरी पत्नीला मूलबाळ होत नसल्याने पतीने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण केली. तुला नांदवायचे नाही, तु माहेरी निघून जा असे म्हणत पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पीडितेने पतीविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पीडितेच्या लग्नाला चार वर्षे होवूनही मूल होत नसल्याने पती-पत्नी वाद होत होते. इलेक्ट्रिक दुकानासाठी माहेरून २ लाख रूपये आणावेत, यासाठी पतीने पत्नीकडे मागणी केली होती. पत्नी पैसे देत नसल्याने तिला घरातून हकलून देत पत्नीने नांदवण्यास नकार दिला. पुढील तपास पोलीस हवालदार आहेर करीत आहेत.