नवरात्री उत्सावाच्या निमित्ताने अभिनेत्री तेजस्विनी पंडितदेखील देवीच्या रुपात प्रेक्षकांच्या समोर आली आहे. रविवारी घटस्थापना म्हणजेच नवरात्रोत्सवातील पहिला दिवस असून तेजस्विनी हिने तिच्या फेसबुक पेजवर हा तिचा देवी अवतारातील फोटो शेअर केला आहे. या आगळ्यावेगळ्या फोटोची कल्पना धैर्य यांची असून फोटोशूटचे दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. तर छायाचित्रकार भारत पवार यांनी ही छाया कॅमेऱ्यात टिपली आहे. तसेच फोटोशूटसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वच सदस्यांचे आभार तेजस्विनीने तिच्या फेसबुकवरून मानले आहेत. सोबतच तिने एक सुंदर संदेशदेखील दिला आहे.
तेजस्विनी म्हणजे की, प्रतिपदा “कोल्हापूरची अंबाबाई”, याच उघड्या डोळ्यांनी विनाशाचं तांडव पाहत होते मी…माझ्यासमोर जोडले जाणारे अनेक हात वाहत जाताना पाहत होते मी…
पण मी अवतरणार तरी कशी? सावरणारे माझे हात टप्या टप्प्याने छाटलेस तू… कधी मोठ्या रस्त्यांसाठी, कधी साखर कारखान्यांसाठी, तर कधी उंच इमारतींसाठी. ज्या किरणांनी माझं तेज प्रदीप्तीत व्हायचं त्याच्या मार्गातच तुझ्या स्वार्थाचे होर्डिंग्ज लावलेस. मत्स्येंद्री ने फुलणारा माझा रंकाळा जलपर्णीनी जखडून टाकलास तू… म्हणून सावरू शकले नाही तुला… पण शेवटी मी आई आहे. कठोर झाले तरी साथ नाही सोडणार… मी बहारायचं नाही सोडणार, मी बहारायचं नाही सोडणार.
Stay tuned for Navratri 2019 .#TejaswiniPandit #Navratri2019
Tejaswini Pandit ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಗುರುವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 26, 2019
दरवर्षी, सिनेजगतातील कलाकार नवरात्रीला विविध रुपं घेऊन प्रेक्षकांसमोर येतात. यावेळी अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने अंबाबाईचे रुप घेतलेला फोटो शेअर करून त्यांनी सुरुवात केली आहे.