घरमहाराष्ट्रकाँग्रेसला धक्का; सहा आमदार आज भाजपमध्ये जाणार?

काँग्रेसला धक्का; सहा आमदार आज भाजपमध्ये जाणार?

Subscribe

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली तरी देखील काँग्रेसमधील आऊटगोईंग काही केल्या थांबायला तयार नाही. काँग्रेसचे सहा विद्यमान आमदार भाजपच्या संपर्कात असून त्यांना तिकीट न देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला असल्याची माहिती समोर आली आहे. आता हे सहा आमदार आज (दि. ३० सप्टेंबर) भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. आमदार अस्लम शेख, राहुल बोंद्रे, काशिराम पावरा, डी. एस. अहिरे, सिद्धराम म्हेत्रे आणि भारत भालके या सहा आमदारांचा पक्षप्रवेश होईल, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांनी मात्र पक्षप्रवेशाच्या या चर्चांना फेटाळून लावले आहे. माय महानगरला प्रतिक्रिया देताना बोंद्रे म्हणाले की, “निवडणुकीच्या काळात अशा अफवांना पेव फुटत असते. मी सध्यातरी माझ्या मतदारसंघात आहे.” भाजपने मात्र आज दुपारी १२ वाजता मुंबईच्या गरवारे क्लब येथे विशेष कार्यक्रम आयोजित केला असल्याचा निरोप माध्यमांना दिला आहे. गरवारे मधील विशेष कार्यक्रम म्हणजेच भाजपमध्ये मेगाभरती हे समीकरण या निवडणुकीत बनलेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा तथाकथित विशेष कार्यक्रम संपन्न होणार असल्याची देखील माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नारायण राणे २ ऑक्टोबरला भाजपमध्ये प्रवेश करणार

राणेंच्या प्रवेशाबाबत भाजपची चुप्पी

दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे २ ऑक्टोबर म्हणजे गांधी जयंतीच्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नारायण राणे यांच्या ‘प्रहार’ या दैनिकाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, या प्रवेशाबाबत भाजपच्या एका नेत्याला विचारले असता त्यांनी अद्याप तरी त्याची कल्पना नसल्याचे सांगत जास्त बोलणं टाळलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात नारायण राणे यांच्या भाजप पक्षप्रवेशावर अजूनही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – उदयनराजेंच्या विरोधात पृथ्वीराज चव्हाण लोकसभा लढविणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -