घरमुंबईसंजय राऊतांची अँजिओग्राफी झाली, ह्रदयात २ ब्लॉक!

संजय राऊतांची अँजिओग्राफी झाली, ह्रदयात २ ब्लॉक!

Subscribe

गेल्या १५ दिवसांपासून युतीमधली आणि राज्यातल्या राजकारणाची शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या ह्रदयात २ ब्लॉक असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यांना दुपारीच मुंबईच्या लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आधी रुटीन तपासणीसाठी त्यांना दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मात्र, आता त्यांची अँजिओग्राफी झाल्यानंतर त्यांच्या ह्रदयात २ ब्लॉक असल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यावर लागलीच शस्त्रक्रिया करण्यात येत असून येत्या २ दिवसांमध्ये संजय राऊत पुन्हा कार्यरत दिसतील, अशी माहिती त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, सध्या राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींची सर्व माहिती संजय राऊत यांनी घेतली असल्याचं देखील सुनील राऊत यांनी नमूद केलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -