- Advertisement -
शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत दहा रुपयांत थाळी देण्याच्या दिलेल्या आश्वासानाची सुरुवात मुंबई महापालिकेतून झाली आहे. मुंबई महापालिकेच्या उपहारगृहात अवघ्या १० रुपयांत थाळी देण्याच्या उपक्रमाचा पालिकेत शुभारंभ करण्यात आला. पालिकेने दहा रुपयांत थाळी सुरू केली असली तरी ती केवळ पालिका कर्मचाऱ्यांपुरतीच मर्यादीत आहे. इतरांना पालिकेच्या उपहारगृहातून ठरवून दिलेल्या किंमतीतच थाळी घ्यावी लागणार आहे.
- Advertisement -