घरमनोरंजनफोर्ब्सच्या यादीत अक्षय, आलिया आघाडीवर

फोर्ब्सच्या यादीत अक्षय, आलिया आघाडीवर

Subscribe

आयएएनएस ने दिलेल्या माहितीनुसार फोर्ब्सच्या यंदाच्या यादीत अक्षयकुमारची एकूण कमाई २९३.२५ कोटी एवढी राहिली.

फोर्ब्सने १०० भारतीय सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत अक्षयकुमारने दुसरे स्थान पटकावले आहे. अक्षयसाठी वर्ष २०१९ हे खूप चांगले गेले. यावर्षी त्याचे केसरी, मिशन मंगल आणि हाऊसफुल ४ हे चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचप्रमाणे लवकरच गुड न्यूजमधून सुद्धा तो प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. केसरीने १५३ कोटी रुपये, मिशन मंगलने २००.१६ कोटी रुपये तर हाऊसफुल ४ ने २०६ कोटी रुपयांची कमाई केली. तिन्ही चित्रपट मिळून अक्षयने ५०० कोटींहून अधिक बॉक्स ऑफिसवर कमाई केली.

आयएएनएस ने दिलेल्या माहितीनुसार फोर्ब्सच्या यंदाच्या यादीत अक्षयकुमारची एकूण कमाई २९३.२५ कोटी एवढी राहिली. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा त्याच्या कमाईत ५८.५१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. दरम्यान आज सलमानचा दबंग ३ हा चित्रपट प्रदर्शित झाला. फोर्ब्सच्या यादीत सलमान खान तिसऱ्या स्थानावर आहे. सलमानची एकूण कमाई २२९.२५ कोटी एवढी आहे. यंदा सलमानच्या फोर्ब्सच्या यादीतील क्रमवारीत घसरण झाली असून क्रिकेटर विराट कोहलीने त्याला मागे टाकले आहे. विराट कोहलीने यंदाच्या वर्षी २५२.७२ कोटी रुपयांची कमाई केली आहे. दरम्यान मागील वर्षी फोर्ब्सच्या यादीत सलमान सर्वोच्च स्थानी होता.

- Advertisement -

अशी तयार केली यादी

सेलिब्रिटीजची कीर्ति आणि विविध स्त्रोतांकडून मिळालेली उत्पन्नाची माहिती या आधारे फोर्ब्सची २०१९ चे टॉप १०० सेलिब्रिटींची यादी तयार करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१८ ते सप्टेंबर २०१९ या दरम्यान सेलिब्रिटींचे उत्पन्न यासाठी ग्राह्य धरण्यात आले.

हेही वाचा – आयपीएल लिलावात ‘या’ मिस्ट्री गर्लने लावली कोट्यावधींची बोली!

पहिल्या दहामध्ये आलिया एकमेव अभिनेत्री

या यादीत पहिल्या दहामध्ये बॉलीवूडचा किंग खान शाहरुख यांचासुद्धा समावेश आहे. यंदाच्या वर्षी त्याचे उत्पन्न १२४.३८ कोटी एवढे होते. विशेष म्हणजे यंदा शाहरुखचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. पण प्रोडक्शन आणि जाहिरातींच्या माध्यमातून त्याने उत्पन्न कमावले आहे. या यादीत आलिया भट्ट या एकमेव अभिनेत्रीला पहिल्या दहा जणांच्या रांगेत स्थान पटकावता आले आहे. या वर्षी आलियाचे गली बॉय आणि कलंक हे चित्रपट प्रदर्शित झाले.

- Advertisement -

दिग्गजांसह नवोदितांनी पटकावले ‘हे’ स्थान

सुपरस्टार रजनिकांत यांनी या यादीत १३वे स्थान पटकावले आहे. तर प्रियांका चोप्रा १४ व्या स्थानी आहे. मागील वर्षी प्रियांका ४९व्या स्थानावर होती. त्यामुळे प्रियांकाची या यादीतील क्रमवारी यंदा कमालीची सुधारली आहे. अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने २१ वे स्थान पटकावले आहे. नवोदित अभिनेत्री सारा अली खान या यादीत ६६व्या क्रमांकावर आहे. तर अभिनेत्री दिशा पटानी आणि कृती सेनॉन यांनी प्रथमच या यादीत स्थान पटकावले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -