घरताज्या घडामोडीसर्वात आधी चंपा म्हणणाऱ्या अजितदादांचे चंद्रकांत दादांकडून तोंडभरून कौतुक

सर्वात आधी चंपा म्हणणाऱ्या अजितदादांचे चंद्रकांत दादांकडून तोंडभरून कौतुक

Subscribe

राज्यातील राजकारणातले दोन दादा सध्या चांगलेच चर्चेत आहेत. विधानसभा असो किंवा राजकीय मंच दोन्ही दादा जोरदार शाब्दिक फटकेबाजी करतात. आज पुणे महानगरपालिकेने आयोजिक केलेल्या एका कार्यक्रमात हे दोन्ही दादा एकाच मंचावर आलेले पाहायला मिळाले. यावेळी अजितदादा तुम्हीच सध्या मुख्यमंत्री आहात, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी अजितदादांचे तोंडभरून कौतुक केले. यामुळे उपस्थितांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. विशेष म्हणजे चंद्राकांत पाटील यांना चंपा हे नाव सर्वात आधी अजितदादा यांनीच दिले होते. त्यानंतर राज ठाकरेंनी देखील याच नावावरुन पाटील यांच्यावर टीका केली होती.

हे वाचा – ‘चंपा’ला पवार साहेबांशिवाय काही दिसत नाही; भाजप नेत्यावर अजित पवारांची टीका

- Advertisement -

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब दवरस एव्हीएशन गॅलरीचा उद्घाटन सोहळा आज संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. “अजितदादा तुम्हाला मुख्यमंत्र्यांशी बोलण्याची गरज भासत नसेल, कारण तुम्हीच मुख्यमंत्री आहात. अजितदादांना निर्णय घ्यायला वेळ लागत नाही. ते धडाधडीने काम करतात. तसेच ते डायनॅमिक लीडर आहेत.”, अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी स्तुतीसुमने वाहिली.

चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले की, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक विमानतळ असायला हवे. मागच्यावर्षी सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर लष्कारालाही तिथे जाता आले नाही. त्यामुळे छोटे का होईना, पण विमान उतरण्यासाठी छोटेसे विमानतळ हवे. तसेच तालुक्यात हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड असावे. अजितदादांना मुख्यमंत्र्यांशी बोलावे लागत नाही. त्यामुळे अजितदादांनी पटकन निर्णय घेऊन टाकावा, अशी मागणी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -