३ मे पर्यंत देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून काय करायचं हा प्रश्न सगळ्यांना पडला होता. मात्र टिव्ही वाहिन्यांनी हा प्रश्न सोडवला आहे. लोकांची मागणी बघून अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू करण्यात आले. यात रामायण, महाभारत, चिमणराव आणि गुंड्याभाऊ या मालिकांबरोबरच झी मराठीवरील अनेक मालिकांचे पुन: प्रक्षेपण सुरू झाले. मात्र ९०च्या काळात ज्याप्रमाणे रामायण मालिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं तेच प्रेम पुन्हा एकदा मालिकेला मिळाल्याचे दिसून आले. रामायण, महाभारत यांसारख्या प्रसिद्ध मालिकांनंतर दूरदर्शन लवकरच श्री कृष्ण ही मालिकाही पूर्नःप्रक्षेपित करणार आहे.
खुश्खबहारी हमारे दर्शकों के लिए !!
जल्द आ रहा है "श्री कृष्णा" @DDNational पर#ShriKrishna pic.twitter.com/noXg4zCJP0— Doordarshan National (@DDNational) April 23, 2020
रामानंद सागर यांची रामायण ही ऐतिहासिक मालिकेचे सध्या उत्तर रामायणाचं पर्व सुरू झालं आहे. यानंतर श्रीकृष्णा ही प्रसिद्ध मालिका प्रक्षेपित केली जाणार आहे. १९९६ मध्ये ही मालिका पहिल्यांदा प्रक्षेपित झाली होती. लॉकडाउनमध्ये दूरदर्शनने रामायम, महाभारत या मालिकांशिवाय शक्तिमान, श्रीमान श्रीमती, देख भाई देख, बुनियाद, सर्कस आणि इपनिषद गंगा अशा अनेक प्रसिद्ध मालिकांचं पूर्न प्रक्षेपण केलं आहे. एवढंच नाही तर जुन्या मालिका दाखवण्यासाठी दूरदर्शनने ‘डीडी रेट्रो’ नावाचं नवीन वाहिनीही सुरू केली.
९० च्या काळात रामायण सुरू झाल्यावर रस्त्यावर शुकशुकाट असायचा हे आपण ऐकले आहे. पण हीच रामायणाची क्रेझ आजही आहे. याचा अनुभव २०२० मधील प्रेक्षकांनीही घेतला. टीआरपीच्या चार्टमध्ये रामायण या धार्मिक मालिकेने इतर सर्व मनोरंजन वाहिन्यांना मागे टाकले आहे आणि टीआरपीचे सर्व विक्रम मोडीले आहेत.
रामायणाची वाढती क्रेझ
१९८८ साली रामायण या मालिकेने अनोखा इतिहास रचला होता. रामानंद सागर यांच्या या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होतं. विशेषत: प्रभू रामाची भूमिका प्रचंड गाजली होती. इतकी की, लोकांनी आपल्या घरात राम आणि सीतेच्या तसबीरीच्या रूपात अरूण गोविल आणि दीपिकाचे फोटो लावले होते. आजही लोक श्रद्धाभावाने अरूण गोविल यांच्या पाया पडतात.
हे ही वाचा – Video – विद्या बालनने घातलाय मोदकांचा घाट!