घरव्हिडिओपरप्रांतीयांचा जीवघेणा प्रवास

परप्रांतीयांचा जीवघेणा प्रवास

Related Story

- Advertisement -
हाताला काम नसल्यामुळे मुंबईतील परप्रांतीयांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे आता परप्रांतीय आपापल्या गावाकडे जीवाची पर्वा न करता निघाले आहेत. मिळेल त्या वाहनाने लोकं गाड्यांच्या टपावर बसून जीवघेणा प्रवास करत आहेत. या वाहतुकीमुळे घोटी टोल नाक्यापासून ते पुढे इगतपुरीपर्यंत तीन ते चार किलोमीटर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात. पोलीस प्रशासन आणि टोल प्रशासन वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपार मेहनत घेत आहेत. परंतु मुंबईहून मोठ्या प्रमाणात वाहने येत असल्याने सकाळपासून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यावर प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करून परप्रांतियांची व्यवस्था करून देणे गरजेचे आहे.
- Advertisement -